नागपूर - महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन १० दिवस उलटले तरीही विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. या मुद्द्यावरून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जोरदार गोंधळ घातला.
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सभापती शिवाजीराव देशमुख यांना घ्यायचा आहे. भाजपचे विनोद तावडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. आता राज्यात भाजपचे सरकार असून तावडे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडले आहे.