आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress State President Manikrao Thackeray Comment On Ajit Pawar At Akola

मुख्यमंत्री होण्यासाठी विश्वास मिळवावा लागतो; ठाकरे यांचा अजित पवारांना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी संख्याबळ आणि लोकांचा विश्वास मिळवावा लागतो. नुसते बोलून चालत नाही,’ असा टोला कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लगावला.
अकोला येथे कॉँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, चिटणीस अनिस अहमद, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते. विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना, भाजप- मनसेच्या वतीने सत्तेवर बसणार्‍यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही यावेळी माणिकरावांनी राष्टÑवादी कॉँग्रेसला दिला. शिवराळ भाष वापरणार्‍या राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली.
मोहन प्रकाश म्हणाले की, आजवर काँग्रेसने जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा निर्णय असो वा शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेसनेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य भविष्यातही कॉँग्रेस पूर्ण करीत राहिल.
मुख्यमंत्री म्हणाले की, अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असून, लवकरच या ठिकाणी रात्रीचे विमान उतरण्याची सुविधा सुरू केली जाईल. इतर प्रलंबित समस्यांवर विचार सुरू आहे. गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.