आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी आज अमरावतीत; पहिल्यांदाच चालणार १५ किलोमीटर पायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेणार अाहेत. या दाैऱ्यात राहुल हे सुमारे १५ किलाेमीटर पदयात्रा काढणार असून त्या वेळी सुरक्षा पुरवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. दरम्यान, या दाैऱ्यात द्यावयाच्या बंदाेबस्ताची पाेलिसांकडून जय्यत तयारी करण्यात अाली असून बुधवारपासूनच जिल्ह्यात कडेकाेट बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता.

सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अमरावती विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रशेखर उघडे म्हणाले, ‘व्हीआयपी दर्जाच्या राहुल गांधी यांना सुरक्षा पुरवण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे. मात्र, गांधी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुरेपूर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण दौऱ्यात राहुल गांधी यांना ज्या भागात भेटी द्यायची इच्छा असेल तेथे पोलिसांची सुरक्षा तैनात राहणार आहे, असे उघडे यांनी सांगितले. गांधी यांच्या सुरक्षेकरिता राज्य पोलिस दलातील सुमारे ७०० पोलिसांचा बंदोबस्त आहे.’

पोलिसांनी घेतला गावांचा ताबा
धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी, शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यातील रामगाव, राजना, टोंगलाबाद या गावांत जाऊन राहुल गांधी तेथील शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधणार अाहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी बुधवारीच या गावांचा ताबा घेतला. राहुल गांधी ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या संपूर्ण परिसराची दर चार तासांनी कसून तपासणी करण्यात येत आहे. राज्य युवक काँग्रेसचे प्रत्येकी पाच पदाधिकाऱ्यांचे विशेष पथक सर्व गावांमध्ये तैनात करण्यात आले आहे. धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील आत्महत्या केलेल्या ९ शेतकऱ्यांच्या परिवारांची राहुल गांधी भेट घेणार आहेत. गुंजी ते रामगाव या १५ किलाेमीटर अंतरावर राहुल पदयात्रेने जाणार अाहेत. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांच्यासाेबत असतील. या भागातील परिस्थितीचे हे नेते राहुल यांना वेळाेवेळी ‘ब्रीफिंग’ करणार असल्याचे सांगण्यात अाले.
युवराजांचे नागपुरात साधेपणाने स्वागत
काँग्रेसचेे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे बुधवारी रात्री ९.४५ वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी मोहन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मात्र राहुल यांच्याच सूचनेनुसार अत्यंत साधेपणाने केवळ सुताचा हार देऊन त्यांचे स्वागत करण्यात अाले. दरम्यान, या वेळी काही कार्यकर्त्यांनी सुरक्षा तोडून गांधी यांना भेटण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इकॉनॉमी क्लासने केला राहुल गांधींनी प्रवास