आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर- गायनाचा सलग 105 तासांचा जागतिक विक्रम रचणारे नागपूरचे गायक सुनील वाघमारे यांनी आणखी एका विक्रमाची नोंद केली. त्यांनी संतचरित्र कथा वाचण्याचा सलग 52 तासांचा विक्रम नोंदवला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचीे नोंद होणार आहे.
दोन वर्षांपूर्वीच वाघमारे यांनी सलग 105 तास गायनाचा जागतिक विक्रम केला होता. त्यानंतर त्यांनी 51 तास संतचरित्र कथा वाचनाचा विक्रम नोंदवण्याच्या दिशेने तयारी सुरू केली होती. कॉटन गीता मंदिरात सुनील यांनी मंगळवारी 11 वाजता अष्टविनायक कथेचे वाचन सुरु केले. गुरुवारी दुपारी 3 वाजता त्यांनी वाचन पूर्ण केले. याप्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी डॉ. सुनीता क्षीरसागर-धोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हनुमान चालिसा, भगवद्गीता, रामचरितमानस, साईचरित्र, र्शी गजानन विजय ग्रंथ, तीर्थंकर भगवान महावीर, ताजुद्दीनबाबा, तुकडोजी महाराज यांच्या चरित्रांचे वाचन केले. डॉ. पिनाक दंदे यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचा चमू लक्ष ठेवून होता. यासंदर्भात डॉ. सुनीता धोटे यांनी सांगितले की, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पूर्वी चौदा विक्रमांची वर्गवारी होती. या वर्षी प्रथमच संतकथेचा समावेश होता.
चरित्रांचे वाचन
हनुमान चालिसा, भगवद्गीता, रामचरितमानस, साईचरित्र, र्शी गजानन विजय ग्रंथ, तीर्थंकर भगवान महावीर, ताजुद्दीनबाबा, तुकडोजी महाराज यांच्या चरित्रांचे वाचन केले.
पूर्वीपासून होती आवड
मला पूर्वीपासून वाचनाची अतिशय आवड आहे. त्यामुळेच असा विक्रम होऊ शकतो काय, याची चौकशी केली. सुदैवाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तशी कॅटेगरीही सापडली. संतकथा वाचनाच्या विक्रमाची नोंद झाल्याने समाधान लाभले आहे, अशी भावना वाघमारे यांनी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.