आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Copy Case In Akola Mpsc Examinition Agriculture Depatment

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सामूहिक कॉपी केल्याचा आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला: राज्य लोकसेवा आयोगाकडून कृषी विभागातील वर्ग एक व दोनची पदे भरण्यासाठी घेतलेल्या मुख्य परीक्षेत पुणे केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार घडल्याची खळबळजनक तक्रार डॉ. पंजाबराव देशमुख करिअर फोरमच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांकडे ही तक्रार पाठवण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी विभागात वर्ग एक व दोनच्या पदभरतीची परीक्षा घेतली होती. त्याअंतर्गत घेतलेल्या प्राथमिक परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी प्राप्त झाली. आयोगाकडून 8 जानेवारी रोजी नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फोरमच्या विद्यार्थ्यांनी सांगितले