आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोडकेंच्या शिलेदारांचा आज होणार फैसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेतील खोडके गटातील नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत मंगळवारी (19 आॅगस्ट) सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेपद व चार नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होईल.
राकाँ फ्रंटचे अविनाश मार्डीकर यांना विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदावरून अपात्र घोषित केले होते. त्यामुळे सुनील काळे यांचा महापालिका गटनेतेपदाचा मार्ग सुकर झाला होता. पालिकेच्या मागील आमसभेत उपमहापौर नंदकिशोर वºहाडे यांनी सभागृहातील गोंधळाच्या वातावरणातच सुनील काळे यांची गटनेतेपदी निवड घोषित केली होती. मात्र, मार्डीकर यांनी आमसभेतील प्रकार व आयुक्तांनी आपणास अपात्र घोषित करू नये म्हणून नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. नागपूर खंडपीठाने दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकाच दिवशी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गटनेतेपदासोबतच अविनाश मार्डीकर, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, चेतन पवार, रिना नंदा यांच्या अपात्रतेबाबतही मंगळवारी सुनावणी होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या न्यायालयामध्ये पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेत सुनील काळे, प्रवीण मेश्राम यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता. गटनेते प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय तसेच कोंकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाचा आधार घेत विभागीय आयुक्तांनी सुनील काळे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याविरोधात धाव घेतलेल्या मार्डीकर यांना उच्च न्यायालय दिलासा देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
फुटीमुळे न्यायालयात धाव
राकाँ दुभंगल्यामुळे खोडके गटावर न्यायालयीन लढाईची वेळ आली आहे. राष्टÑवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत दिलेल्या उमेदवारीचा खोडके गटाने प्रचंड विरोध केला होता. राणा विरोधामुळे खोडके गट राकॉँपासून दूर गेला. महापालिकेच्या राजकारणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.