आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस खरेदीला उतरती कळा; २७ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- पणन महासंघाच्या कापूस खरेदीला लागलेली उतरती कळा काही केल्या पुन्हा तेजीत येण्याचे नाव घेत नाही. शनिवारी राज्यातील २७ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात झाली. तीन दिवसांत म्हणजेच सोमवारपर्यंत पणन महासंघाची फक्त १,४४० क्विंटल कापूस खरेदी झाली. पणन महासंघ आता सीसीआयचा उपअभिकर्ता (सबएजंट) म्हणून खरेदीचे काम करत आहे. मधल्या काळात शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या कापूस खरेदीकडे पाठ फिरवल्याने खरेदीच झाली नाही. त्यामुळे पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांना काही कामच उरले नव्हते. दरम्यानच्या काळात पणन महासंघाचे कृषी विभागात समायोजन करण्याचा विचार पुढे आला होता. पण, पुढे त्यावर काही
झाले नाही.

या हंगामात निदान १,४४० क्विंटल का होईना खरेदी झाली, याचाच पणनच्या कर्मचाऱ्यांना आनंद आहे. अकोला, अमरावती, नांदेड आदी ४ ते ५ केंद्रांवर शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने कापूस खरेदीच झालेली नाही. असे असले तरी आमदार तसेच शेतकऱ्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना पणनच्या वरिष्ठांनी िदल्या आहे. एकेकाळी २३ लाख क्विंटल वगैरे खरेदी करणाऱ्या पणन महासंघाची कापूस खरेदी कमी कमी होत हजार क्विंटल आणि आता शेकड्यावर आली आहे.