आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरात कारमधून ६६ लाखांची रोकड जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - नागपूरकडून भुसावळकडे जाणाऱ्या एका मारुती कारमधून पोलिसांनी ६६ लाख ४६ हजार ९१३ रुपयांची बुधवारी रोकड जप्त केली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

राज्यात नुकतीच आचारसंहिता जारी झाली आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही रक्कम निवडणुकीसाठी आली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर यांच्या आदेशावरून जिल्हाभरात वाहन तपासणी मोहीम सुरू आहे. नांदुरा नाक्याजवळ नागपूर - मुंबई महामार्गावर तपासणी करत असताना संध्याकाळी या कारला थांबवून ितची तपासणी केली असता त्यात दोन बँगमध्ये सुमारे ६६ लाख ४६९१३ रुपयांची रोकड आढळून आली. अधिक चौकशी केली असता वाहनातील व्यक्तींनी आपले नाव आनंद माणिकराव मेश्राम, स्वप्निल प्रकाश जुमडे व ितसऱ्या व्यक्तीने दिवाकर आलती (सर्व रा. नागपूर) असे सांगितले.

तसेच आपण तिघे पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीचे अधिकारी असून, ही रक्कम कपंनीची आहे व ती आम्ही नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला येथून जमा करुन भुसावळ कार्यालयात नेत असल्याचे सांगितले.दरम्यान, पोलिसांनी तिघांना अधिक तपासणीकामी रक्कम जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.