आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daughter And Mother Caught In Sex Racket In Nagpur

गुप्त खोलीत आई मुलीकडून करून घेत होती वेश्याव्यवसाय, बाथरूममधून होता रस्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून एक युवतीसह दलालला व तिच्या आईला ताब्यात घेतले. पोलिस तपासात पुढे आले की, ज्या महिलेला अटक करण्यात आले ती स्वतच्याच मुलीकडून वेश्वाव्यवसाय करून घेत होती. पतीच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी पैशाची गरज असल्याने सर्वप्रथम आईने वेश्या व्यवसायत उडी घेतली मात्र, त्यातूनही आर्थिक खर्च भागत नसल्याने आईने थेट मुलीलाच या व्यवसायात उतरविल्याचे तपासात समोर आले आहे. अनिता असे हा आईचे नाव आहे. तिने आपल्याच राहत्या घरात हा व्यवसाय सुरु केला होता व त्यासाठी एक गुप्त खोलीही तयार केली होती. पोलिसांनी छापा टाकला तरी काही सापडू नये म्हणून अनिताने बाथरूममधून त्या गुप्त खोलीत जाण्यासाठी रस्ता ठेवला होता. या अनिताला पीडीत युवती मुलीने राजस्थानातून पोलिसांच्या मदतीने सोडवून आणले होते. अनिताला अटक केली आहे युवतीची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
आई आधी करायची वेश्याव्यवसाय-
याबाबत माहिती समोर आली आहे की, काही दिवसापूर्वी अनिताला राजस्थानमधील झालावर जिल्ह्यातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हजारो रूपये खर्च करून सोडवून आणले होते. अनिताच्या या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती तिची आई अनिताचे अपहरण झाले असून तिला राजस्थानात विकले गेले आहे. पोलिसांनी जोखीम पत्कारून अनिताला राजस्थानातून सोडवून आणले. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच अनिताने आपल्या घरातच वेश्याव्यवसाय सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे. पतीच्या निधनानंतर घरखर्चासाठी प्रथम अनिता एकटीच वेश्वाव्यवसाय करीत होती. मात्र नंतर आपल्या मोठ्या मुलीलाही या व्यवसायात उतरवले. अनिताला दोन मुली आहेत. लहान मुलगी शाळेत शिकते.
मुलीचा साखरपुडा मागच्याच आठवड्यात उरकला-
अनिताने आपल्या ननदेच्या मुलासोबत वेश्या व्यवसाय करीत असलेल्या थोरल्या मुलीचा साखरपुडा केला होता. 3 जून रोजी हा कार्यक्रम झाला असून, त्याचा मंडपही अनिताच्या दारात अजून उभा आहे. या घटनेनंतर भावी नवरदेवाने पोलिसांचे आभार मानून एका भयंकर गोष्टीपासून वाचवल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अनितावर कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अनिताकडे अनेक लोकांची रात्री बेरात्री वर्दळ सुरु होती त्याचा आम्हाला त्रास होत होता असे शेजा-यांनी सांगितले. अनिताने एका व्यक्तीशी पुनर्विवाह केल्याचे समोर आले आहे.