आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Certificate For Missing Person In Uttarakhand, Relative Get 5 Lack

उत्तराखंडमधील बेपत्तांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळणार, नातलगांना 5 लाखांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उत्तराखंडच्या महाप्रलयात बेपत्ता झालेल्यांना राज्य सरकारतर्फे मृत्यूचा दाखला दिला जाणार आहे. त्यासाठी नातलगांनी एफआयआरसह संबंधित निवासी उपजिल्हाधिका-यांकडे शपथपत्र द्यायचे आहे. हे शपथपत्र उत्तराखंड सरकारकडे पाठवले जाईल.


उत्तराखंड सरकार बेपत्ता व्यक्तींची संपूर्ण माहिती राजपत्रात हिंदी तसेच इंग्रजीत प्रसिद्ध करील. कायम बेपत्ता असलेल्यांची नावे स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध केल्यावर 30 दिवसांत माहिती मिळाली नाही, तर नातलगाला पाच लाखांची मदत दिली जाईल. बेपत्ता लोकांच्या नावावरील व्यवहार बंद असून प्रमाणपत्रामुळे मार्ग निघू शकणार आहे. राज्यातील 165 लोक बेपत्ता असून यात मराठवाड्यातील 71, नागपूर 44, पुणे 28, नाशिक 4, अमरावती 4 तर कोकणातील 14 भाविक आहेत.