आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis Statement About Mahayuyi, Divya Marathi

भाजप स्वतंत्रपणे लढणार नाहीच, प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा भाजपचा विचार नाही. तसा कोणताही निर्णय झालेला नसून, तशी शक्यताही नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना युती तुटणार, महायुतीतून भाजप बाहेर पडणार, अशा चर्चांना पूर्णविराम द्यावा,’ असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.

स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत कोणी काहीही बोलले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असेच गृहीत धरावे. ते पक्षाचे मत नाही किंवा निर्णयही नाही. शिवसेनेतूनही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत कुणी काहीही बोलले तरी आम्ही ते त्यांचे वैयक्तिक मतच समजू. महायुतीत शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांच्याच मताला सर्वोच्च महत्त्व आहे. त्यामुळे जोवर ते अधिकृतपणे भाष्य करीत नाहीत, तोपर्यंत कुणी कितीही युती तोडण्याबद्दल बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, असे आमदार फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘शिवसेना-भाजप युती ही सत्तेसाठी नव्हे तर लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कारणावरून युती तुटणार नाही,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.