आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या बसला अपघात; एक ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - लक्झरी बस चिखली- मेहकर मार्गावर रस्त्यालगतच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक ठार, तर सात जण जखमी झाले. बसमधील सर्व प्रवासी आंध्र प्रदेशातील होते. चिखलीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलारा फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला.


हैदराबाद येथील राजेंदरसिंग विजयसिंग (22) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये राजेशसिंग भारतसिंग, राणीबाई भारतसिंग, नंदकिशोरसिंग भारतसिंग, अनिता नंदकिशोरसिंग, रेणुकाबाई जयपालसिंग, गायत्री राजेशसिंग, अन्नुभाई राजेशसिंग यांचा समावेश आहे. ते गोवळकोंडा जिल्ह्यातील अलिजापूरचे रहिवासी आहेत.
बसमधील 30 जण 21 मेपासून उत्तर भारतात देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची 22 दिवसांची यात्रा होती. परतीच्या प्रवासात मंगळवारी ओंकारेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण दर्शनासाठी बासर येथे जात होते. चिखलीजवळच्या कोलारा फाट्याजवळ वाहनचालक सय्यद ताहेर सय्यद रसूल (वय 48, रा. चंद्रायणकुंड, जिल्हा रंगारेड्डी ) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली.