आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhmmachakra Pravartandeen Main Festivel Performe On Sunday

धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा मुख्य सोहळा होणार रविवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त गुरुवारपासून नागपूर येथील दीक्षाभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर मुख्य सोहळा रविवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी मंगळवारी दिली.


रविवारी सकाळी 9 वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येईल. या वेळी थायलंड, म्यानमार, अमेरिका या देशातील सुमारे 57 भिक्खू उपस्थित राहणार आहेत.


केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, महापौर अनिल सोले आदींची प्रमुख उपस्थिती राहील. गुरुवारी दुपारी 12 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या संमेलनाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सायंकाळी 6 वाजता महिला परिषद होईल. शुक्रवारी सकाळी 10 वाजता स्थानिक गरोबा मैदान येथून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत विदेशातून आलेले सर्व भिक्खू सहभागी होतील. या रॅलीचा समारोप दीक्षाभूमीवर होईल. त्या नंतर दीक्षा समारंभ होईल. शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 6 वाजता धम्म परिषद होणार आहे.