आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षाभूमीवर निनादले बुद्धवंदनेचे सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आकाशाने नाकारलेल्या पंखांना उडण्याचे बळ देणारे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दीक्षाभूमी आणि संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली, तर सायंकाळच्या तांबूस प्रकाशात दीक्षाभूमी न्हाऊन निघाली. प्रज्ञा, शील, मैत्री, करुणेचा सागर असलेल्या बौद्ध धम्माने सार्‍या जगाला आपलेसे केले आहे, त्या बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाची उजळणी नागपूरच्या एका हॉटेलमध्ये झाली.

बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचे उजळणीस्थळ असलेल्या सीताबर्डीतील या हॉटेलसमोर डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली होती. त्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दीक्षाभूमीसह श्याम हॉटेल परिसरात बुद्धवंदनेचे स्वर निनादले. हॉटेल श्याम दीक्षास्मारक झालेच पाहिजे ही भीमगर्जना कार्यकर्त्यांनी केली.

डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेसह वस्त्या-वस्त्यांमधून दीक्षाभूमी आणि संविधान चौकात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. शहराच्या चारही दिशेने निघालेल्या मिरवणुकांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.