आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळ्या विदर्भासाठी ‘करा किंवा मारा’चा नारा; आत्मघाती जत्थेही तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - वेगळय़ा विदर्भाचे आंदोलन हिंसक होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी विदर्भवाद्यांनी ‘करा किंवा मारा’चा नारा दिला. यासाठी आत्मघाती जत्थे तयार झाल्याचे खळबळजनक वक्तव्य विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी केले. पथकात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

रूपरेषा ठरवण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉकच्या बॅनरखाली अधिवेशन घेण्यात आले. नागपूर राजधानीसह विदर्भाचे राज्य वेगळे करावे, असा ठराव या वेळी करण्यात आला. विदर्भाचा लढा तीव्र करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा धोटे यांनी दिला. विदर्भाला विरोध करणार्‍या शिवसेनेवरही त्यांनी टीका केली.


स्वातंत्र्यदिनी तिघांचा आत्मदहनाचा इशारा
अधिवेशनात नितीन डेमेवार, रवी कुंडकर व सुरेश चिंचोळकर या तरुणांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.