नागपूर - एका डॉक्टर दाम्पत्याच्या वर्षीय मुलाचे शाळेतून परतताना अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी नागपुरातील लकडगंज भागात घडली. युग मुकेश चांडक असे अपहृत मुलाचे नाव आहे. डॉ. मुकेश चांडक आणि त्यांच्या पत्नी प्रेमल चांडक यांना ध्रुव (वय १०) वर्षे युग (अाठ वर्षे) अशी दोन मुले आहेत. नेहमीप्रमाणे मुले शाळेत गेल्यानंतर हे दांपत्य सकाळीच रुग्णालयात गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास एक लाल टी-शर्ट घातलेला एका युवकाने चौकीदाराकडे ‘मुले शाळेतून परतली का?’ अशी चौकशी केली. मात्र मुले अजून अाली नसल्याचे कळाल्यानंतर हा युवक गेटबाहेरच थांबला स्कूल बसमधून उतरताच त्याने युगला दुचाकीवर बसवून पळवून नेले. दरम्यान, डॉ. चांडक यांना अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करुन १० कोटी रुपयांची मागणी केल्याची चर्चा आहे.
परंतु पोलिसांकडून काहीही सांगण्यात येत नाही आहे. अपहरणाचे प्रकरण लक्षात येताच पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहपोलिस आयुक्त अनुपकुमार आणि उपायुक्त निर्मलादेवी यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाची सूत्रे जोरात फिरत असून, नागपूरकरांचे याकडे लक्ष लागले आहे.