आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Arrest Harshwardhan Jadhav, Nagpur Court Order

हर्षवर्धन जाधव यांना तूर्त अटक करू नका, नागपूर न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पोलिस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटकेच्या भीतीने त्यांनी गुरुवारी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने जाधव यांना २९ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

बुधवारी रात्री नागपुरातील हॉटेल प्राइडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेत होते. त्या वेळी सुरक्षा पथकातील पोलिस निरीक्षक पराग जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांना आत जाण्यापासून रोखले. संतापलेल्या आमदार जाधव यांनी पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली, अशी तक्रार सोनेगाव पोलिस ठाण्यात दिली आली. शासकीय कामकाजात अडथळा व अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी आमदारांवर गुन्हा दाखल आला. आमदारांतर्फे अ‍ॅड. रफिक अकबानी यांनी बाजू मांडताना सांगितले की, ‘२०११ मध्ये काही पोलिसांनी आमदार जाधव यांना बेदम मारले होते. मुखमंत्र्यांनी याप्रकरणी पोलिस महासंचालकांना तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या प्रकरणातील बडे अधिकारी पराग जाधव यांच्या ओळखीचे आहेत. जुन्या प्रकरणाचा त्यांच्यावरही प्रभाव असून बुधवारच्या रात्री आमदार जाधव हे ठाकरेंना भेटायला जात असताना साध्या गणवेशातील पोलिस निरीक्षक पराग जाधव हे त्यांच्याशी उद्धटपणे वागले.’

केवळ बाचाबाची
पराग जाधव हे पोलिस निरीक्षक असल्याची माहिती आमदारांना नव्हती. एका साधा माणूस आपला रस्ता अडवत असल्यामुळे दोघांमध्ये केवळ बाचाबाची झाली. आमदारांनी हात उगारला नाही. त्यामुळे आमदारांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती आमदारांच्या वतीने अ‍ॅड. अकबानी यांनी केली.