आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना आज दुपारी ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तातडीने अमरावतीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉ. पाटील हे शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. तसेच अमरावतीतील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेल्या एका जागतिक परिषदेच्या उद्‍घाटन कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना प्रथम अमरावती येथील बख्तार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक आमदार रावसाहेब शेखावत हे आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना मुंबईकडे विमानाने हलविण्यात येणार आहे.
डॉ. पाटील यांचे चिरंजीव व राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे मुंबईहून विशेष विमान घेऊन अमरावतीकडे रवाना झाले आहेत. त्या विमानात डॉ. पाटील यांना मुंबईकडे हलविण्यात येणार आहे. सध्या पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.