आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Husband Death Woman Become Free And Happy Neerja

पतीच्या मृत्यूमुळे महिलांना मुक्ततेचा आनंद, नीरजा यांचे वादगस्त वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरात पार पडलेल्या राज्यस्तरीय लेखिका संमेलनाच्या समारोपात रविवारी संमेलनाध्यक्ष नीरजा यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. समाजात अशा अनेक महिला आहेत.मूकपणे वेदना सहन करीत त्या एका दडपणाखाली जगत असतात. त्यामुळे नव-याच्या मृत्यूनंतर त्यांना खुश होताना मी पाहिले आहे. अनेक वर्षांच्या दडपणातून मुक्त झाल्याचा तो आनंद असतो, असे नीरजा म्हणाल्या. यामुळे कार्यक्रमस्थळी अस्वस्थता पसरली. महिलांविषयी निर्माती अभिनेत्री स्मिता तळवलकर आणि लालन सारंग यांनी केलेल्या वक्तव्याचा नीरजा यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. प्रभा गणोरकर यांनी त्याला समर्थन दिले.
नंतर सारवासारव : आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे सांगत नीरजा यांनी नंतर सारवासारव केल्याचे समजते.
स्मिता तळवलकरांचे वक्तव्य काय होते
आज मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमधून स्त्री देहाचा बाजार मांडला जातो. यासाठी निर्माता वा दिग्दर्शक जबाबदार नाही असे सांगतानाच मालिका वा चित्रपटांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा रिमोटने टीव्ही बंद करा असे जाहीर आवाहन स्मिता तळवलकर यांनी केले होते.