आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत बँकांकडे आल्या 109 कोटींच्या बनावट नोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूरचे माहिती कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकांकडून माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2014 या पाच आर्थिक वर्षांत पाच रुपयांपासून ते 1000 रुपयांच्या 23 लाख 44 हजार 763 नोटा आरबीआय आणि इतर बँकांकडे आल्या.

हिंसक दहशतवादी कारवायांमुळे चिंतेत असलेल्या भारत सरकारपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस बनावट नोटांचा पाश अधिकच आवळला जात आहे. गेल्या पाच वर्षांत भारतीय चलनाच्या 109 कोटींच्या बनावट नोटा भारतीय बँकांकडे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.