आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dutta Meghe News In Marathi, Divya Marathi, Congress

मेघे, टोकस यांच्यात स्पर्धा; वर्ध्यात आज ‘प्रायमरीज’ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांतून उमेदवार निवडीच्या ‘प्रायमरीज’ प्रक्रियेअंतर्गत रविवारी वर्ध्यामध्ये मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार मेघे आणि राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या गटाचे उमेदवार आमने-सामने आहेत.


काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील कार्यकर्त्यांतून उमेदवार निवडीची प्रक्रिया राज्यात लातूर व वर्धा येथे राबवली जात आहे. लातूरमध्ये 13 मार्चला, तर वर्ध्यात 9 मार्चला मतदान होणार आहे. खासदार दत्ता मेघे यांच्या गटातर्फे त्यांचे पुत्र सागर मेघे, तर राज्यमंत्री रणजित कांबळे गटातर्फे चारुलता टोकस रिंगणात आहे. टोकस या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या आहेत. या निवडणुकीसाठी दिल्लीहून पदाधिकारी येणार आहेत. एकूण 1,303 मतदारांमध्ये काँग्रेसच्या विविध विभागांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, सरपंच आदींचा समावेश आहे.

सरपंचांच्या मतांवरून
दावे - प्रतिदावे सुरू झाले आहेत.

आर्वी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या गटात असलेले 18 सरपंच माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेशित झाल्याचा दावा खासदार दत्ता मेघे गटातर्फे करण्यात येत आहे. तथापि, यासंदर्भात आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांच्याशी संपर्क साधला असता, ही निवडणूक राष्‍ट्रीय पक्षाच्या चिन्हावर नाही. सरपंचांना चिन्ह नसते, त्यामुळे त्यांची नावे नोंदवली गेली असतील, पण त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नसून, हा संबंधितांचा केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगितले. दरम्यान, दोन्ही गटातील नेत- कार्यकर्त्यांमध्ये जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजूने करवून घेण्यासाठी चढाओढ लागली असून, यातून प्रकरण हातघाईवरही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.