आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांना प्रत्येकी पन्नास लाखांचा अतिरिक्त विकास निधी - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यात निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेल्या आमदारांना प्रत्येकी पन्नास लाखांचा अतिरिक्त विकास निधी देण्याची तरतूद केल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत शुक्रवारी दिली. राज्यातील २८८ आमदारांना आगामी मार्च २०१५ पर्यंत हा निधी खर्च करता येणार आहे. आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत
प्रत्येक आमदाराला मिळणा-या निधीतून निवडणुकीपूर्वीच कामाचे नियोजन झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या या सर्व आमदारांकरिता १४४ कोटींची तरतूद करावी, असा प्रस्ताव पुरवणी मागणीद्वारे सादर केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.