आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education News In Marathi, Medical Entrance, Divya Marathi

वैद्यकीय प्रवेशासाठी फसवणूक करणारे ६ परप्रांतीय अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली राज्यात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सहा उच्चशिक्षित बिहारी तरुणांना अमरावती पोलिसांनी पुण्यात एका धाडसी कारवाईत अटक केली आहे. यासाठी, या सहाही जणांनी आरोग्य शिक्षण विभागाची वेबसाइट देखील हॅक केली होती. अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महािवद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देतो, असे सांगत या सहा तरूणांनी अविनाश चंदेल यांची २२ लाख रुपयांनी फसवणूक केली हाेती. याप्रकरणी गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. प्रकरणाचा तपास करीत सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली. फसवणूक करणाऱ्यांनी चंदेल यांना संपर्क साधण्यासाठी वापरलेल्या मोबाईल सीम कार्डाच्या आधारे सायबर सेलने या सहाही ठगांना गजाआड केले आहे.

अशी करायचे फसवणूक : चैनीसाठी पैसे हवे म्हणून हे सहाही जण लोकांची फसवणूक करायचे. त्यांच्याकडून डायरी जप्त करण्यात आली असून, त्यातील नोंदीवरुन त्यांनी राज्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी या सहाही जणांकडून एक लाख रुपये रोख, १२ मोबाइल, दोन डझन सीमकार्ड जप्त केले आहेत. बनावट नावाने असणारे िनवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्डही पोलिसांना सापडले .
हे आहेत सहा आरोपी : आदित्य रत्नेश्वर झा, दीपक दुर्गानंद झा, सुजित सिंग वीरेंद्र सिंह, सुरदेव सिंग लालबहादूर सिंह, पप्पू राजकुमार िसंह,अभिषेक
सूर्यकांत उमाळे,

कोट्यवधींच्या लुटीची शक्यता
या सहाही जणांनी राज्यभरात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता आहे. प्रत्येकाकडून घेतलेल्या रक्कमेचा हिशेब लावला तर ही रक्कम २० ते २५ कोटीही होऊ शकते. तसा तपास सुरू आहे.
सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त