आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकार्‍यावर कारवाई करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी निरंजन धांदे यांच्या भ्रष्टाचाराच्या मालिकेची अनेक प्रकरणे असताना त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांना गुरुवारी केला.

निरंजन धांदे हे सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा दुरुपयोग करून धांदे यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप दमानिया यांनी केला. याबाबतचे निवेदन त्यांनी जगताप यांना दिले. जिल्हा परिषद उर्दू आय.एम.एस. शाळेतील पहिली ते सातवीच्या 14 तुकड्यांमधील पटसंख्या व प्रत्यक्ष उपस्थिती यामध्ये प्रचंड तफावत आढळली आहे. याशिवाय अतिरिक्त ठरलेल्या सय्यद साबीर अली, नुसरत सै. सादीद, शकील बानो जि. अहमद, सै. मलिका तबसुन, सै. समना अंजु, शाहिसा बानो, अमीकुर रहमेना, काजी जाहिरोद्दीन या आठ शिक्षकांचे स्थानांतर गैरसोईच्या दुर्गम भागात होऊ नये म्हणून त्यांना शाळेच्या आस्थापनेवर घेऊन अतिरिक्त पगार काढला. याबाबतची चौकशी अमरावती पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी केल्यानंतर घोळ उघड झाला.

संबंधित प्रकरण माझ्या कार्यकाळातील नसल्याने माझा त्याच्याशी संबंध नाही. ते प्रकरण त्यावेळी असलेल्या गटशिक्षणाधिकार्‍याशी संबंधित आहे. निरंजन धांदे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.

फायली गहाळ
निरंजन धांदेंविरुद्ध तक्रारी आलेल्या आहेत. आवश्यक फायली शिक्षणविभागातून गहाळ असल्यामुळे चौकशीत अडचणी येत आहेत. दोन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. प्रकरणाची सखोल चौकशी करून 15 सप्टेंबरपर्यंत कळवतो. आनंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.