आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत पोलिस- नक्षलींमध्ये चकमक, आठ नक्षलींना कंठस्नान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली- भामरागड तालुक्यातील भटपार जंगलातील गुरुवारी सी-60चे जवान आणि नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत आठ नक्षली ठार झाले आहे. यापैकी पाच नक्षलींचे मृतदेह मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'सी-60'च्या जवानांवर इंद्रावती नदीजवळ 12 नक्षलींच्या चमुने हल्ला चढवला. ते छत्तीसगडमधील बस्तर येथे जात होते. भटपार जंगलातील जवानांवर मर्दमलंगाजवळ नक्षलींना गोळीबार केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात आठ नक्षली ठार झाले. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह मिळाले असल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे.

रीता, गट्टा जांबिया, सरिता उर्फ ज्योति, भूमन्ना उर्फ टुलसा गावडे या नक्षलींचा मृतांमध्ये समावेश आहे.