आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एकलव्य, विदर्भ' ची बाजी, अमरावतीचे युवक मंडळ अन् खानापूरच्या संघाला उपविजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार राहिलेल्या शशांक वानखेडेच्या आक्रमक खेळाच्या आधारे नागपूरच्या एकलव्य क्रीडा मंडळाने पुरुष गटातील अंतिम सामन्यात अमरावतीच्या युवक क्रीडा मंडळाचा ४८-२७ गुणांनी पराभव करून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
उपविजेत्या संघातील उज्ज्वल सामुद्रेने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याला रोख ५००१ रुपये प्रदान करून मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. शविाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेले श्री लक्ष्मीकांत क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि अमरावती महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मुधोळकरपेठ येथील युवक क्रीडा मंडळाच्या मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी आयोजित केली होती. स्पर्धेच्या महिला गटातील एकतर्फी अंतिम सामन्यात विदर्भातील नामांकित कबड्डीपटू सरिता नैनवारच्या नेत्रदीपक खेळाच्या बळावर नागपूरच्या विदर्भ क्रीडा मंडळाने खानापूरच्या एकलव्य क्रीडा मंडळाचा ४०-१५ गुणांनी पाडाव करून अजिंक्यपद पटकावले. सरिता नैनवारला संपूर्ण स्पर्धेतील देखण्या कामगिरीमुळे ३००१ रुपयांचा मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर एकलव्य मंडळाकडून दमदार रेड घालणाऱ्या लीना पारधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दोन्ही गटांतील सामनावीर खेळाडूंना वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या पुरुष गटातील रोमांचक उपांत्य सामन्यात नागपूरच्या एकलव्य क्रीडा मंडळाने मूर्तिजापूरच्या गाडगेबाबा क्रीडा मंडळाला ३५-३० गुणांनी नमवले, तर अमरावतीच्या युवक क्रीडा मंडळाने एचव्हीपीएम संघावर २१-१८ गुणांनी मात केली. महिला गटातील अंतिम चारमध्ये विदर्भ क्रीडा मंडळ नागपूरने संघर्ष क्रीडा मंडळ नागपूरला ३०-१० गुणांनी बाहेर केले तर दुसऱ्या रोमांचक लढतीत खानापूरच्या एकलव्य क्रीडा मंडळाने नागपूरच्या नेहरू क्रीडा मंडळाला १३-८ गुणांनी दणका िदला.

आजी-माजीखेळाडूंचा सत्कार :
शताब्दीवर्षानिमित्त श्री लक्ष्मीकांत क्रीडा मंडळाने राष्ट्रीय अन् अ. भा. विद्यापीठ कबड्डी स्पर्धा गाजवणारे माजी खेळाडू रामू नवाथे, नारायण बांते, सुधाकर ठेंगरे, सुभाच चव्हाण, नितीन शविरात्रीवार, मनोज अंबाडकर, हरीश शिष्टे, अतुल देशमुख, नीलेश लामकाने, आशीष लाड, सुनील श्रीराव यांच्यासह नुकतेच राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत राज्याला पदक िमळवून देणाऱ्या महिला जलतरणपटू सांजली वानखडे, वैष्णवी श्रीवास, पायल अजमिरे यांचा सत्कार केला. जीतू भेले, मनीष भुतण, जितेंद्र राऊत, मुख्य पंच टी. एस. सौर यांनाही गौरवले.

पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार श्रीकांत देशपांडे, मनपा स्थायी समिती सभापती विलास इंगोले, दिगंबर डहाके, राजू महल्ले यांच्या हस्ते विजेते उपविजेते संघ आणि खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले. युवक क्रीडा मंडळाच्या उज्ज्वल सामुद्रेने पुरुष गटात मालिकावीर, तर विदर्भ क्रीडा मंडळ नागपूरच्या सरिता नैनवारने महिला गटात मालिकावीर पुरस्कार पटकावला. सामनावीर खेळाडूंना वॉटरफिल्टर प्रदान करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार श्रीकांत देशपांडे, मनपा स्थायी समिती सभापती विलास इंगोले, दिगंबर डहाके, राजू महल्ले यांच्या हस्ते विजेते उपविजेते संघ आणि खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले. युवक क्रीडा मंडळाच्या उज्ज्वल सामुद्रेने पुरुष गटात मालिकावीर, तर विदर्भ क्रीडा मंडळ नागपूरच्या सरिता नैनवारने महिला गटात मालिकावीर पुरस्कार पटकावला. सामनावीर खेळाडूंना वॉटरफिल्टर प्रदान करण्यात आले.

विदर्भातील खेळाडूंचा समावेश
राज्यस्तरीयकबड्डी स्पर्धेत विदर्भातीलच सर्व कबड्डीपटूंनी झुंज दिली. कारण विजेतेपद मिळवण्यासाठी आपल्या खेळाडूंना डावलून काही मंडळांनी याआधी परप्रांतीय अन् महाराष्ट्रातील खेळाडूंना खेळवल्याचे उघड झाले होते. त्याची दखल घेत श्री लक्ष्मीकांत क्रीडा सांस्कृतिक मंडळाने बाहेरील खेळाडू खेळणार नाहीत, तर विदर्भातील कबड्डीपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, याची खबरदारी बाळगल. प्रथमच वैदर्भीय कबड्डीपटूंना ही संधी मिळाली.