आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 Preparation In Nagpur And Vidarbha

चाहूल निवडणुकीची : सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी सक्रिय, नेत्यांमध्ये आंदोलनाची स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - निवडणूक खुणावत असली की नेते सक्रिय होतात. आंदोलनाचे मुद्दे शोधून सर्मथकांसह कामाला लागतात. नेमकी हीच स्थिती सध्या नागपुरात दिसत असून राजकीय नेत्यांच्या आंदोलनांचे सध्या पेव फुटले आहे. राजकीय पक्षांमध्ये आंदोलनाची स्पर्धा रंगते आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरी राजकीय नेत्यांकडून निवडणूकपूर्व मशागतीची कामे सुरु झालेली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये त्यासाठी स्पर्धा लागली आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष सध्या आघाडीवर आहेत. नागपुरात सुमारे दहा दिवस चाललेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात साऱ्याच पक्षांनी सहभागी होऊन आपले हात धुवून घेतले. त्यातून युवाशक्तीला गोंजारण्याचे प्रयत्न केले. तत्पूर्वी काँग्रेसने भाजपशासित महापालिकेच्या योजनांमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न चालविले.

फडणवीस यांचा जनता दरबार
दुसरीकडे भाजपही आंदोलनाच्या स्पर्धेत मागे नाही. भाजपनेही स्थानिक वीज वितरण फ्रॅंन्चाईझी कंपनी स्पॅनकोच्या विरोधातील आक्रोश रस्त्यावर आणला. राज्यातील आघाडी सरकारच्या वीज वितरण धोरणाला लक्ष्य केले गेले. स्पॅनकोच्या कार्यालयांची तोडफोड झाली. लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जनता दरबार घेतला. या जनता दरबारात बोलताना फडणवीस यांनी महापालिकेशी संबंधित अनेक समस्यांवर चक्क महापालिका आयुक्तांना जबाबदार ठरविताना काँग्रेस नेत्यांनाही टीकेचे लक्ष्य केले. एखाद्या मुद्यावर एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सध्या काँग्रेस व भाजप नेते सोडत नाहीत, अशी स्थिती नागपुरात दिसते आहे.