आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ सातपैकी तिघांना दाखवणार घरचा रस्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे गटनेते म्हणून अविनाश मार्डीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने मनपातील फुटीर नगरसेवकांपैकी तिघांना घरचा रस्ता दाखवत, इतर चौघांसाठी फ्रंटची दारे खुलीच ठेवण्याची भूमिका संजय खोडके यांनी घेतली आहे. शुक्रवारी (दि. २२) दुपारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली.

राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्यानंतर खोडके यांनी वऱ्हाड विचार मंच स्थापन केला होता. असे असले तरी मनपात त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेला राष्ट्रवादी फ्रंट मात्र कायम होता. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीने घोिषत केलेले नवे गटनेते सुनील काळे यांनी मार्डीकर यांच्या पदाला आव्हान दिले. त्यामुळे मार्डीकर यांनाही न्यायालयात धाव घ्यावी लागली.

प्रारंभी हा वाद विभागीय आयुक्तांच्या दालनात पोहोचला. त्यािठकाणी अपयश आल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. शुक्रवारी (दि. २२) या प्रकरणाचा सोक्षमोक्ष झाला. त्यात मार्डीकर विजयी झाले. हा सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर खोडके यांनी आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पार्टी, मुस्लमि लीग व रिपाइंने मिळून राष्ट्रवादी फ्रंट तयार केला होता. एकूण २३ सदस्य त्यामध्ये होते.

गटनेते म्हणून त्या सर्वांना मार्डीकर यांचे म्हणणे एेकणे गरजेचे असतानाही लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यातील सात सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांपैकी चौघांसाठी फ्रंटची दारे उघडी असून, तिघांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचे ते म्हणाले.