आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 % मतदानाचे आयोगाचे उद्दिष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 2009 च्या निवडणुकीत देशात अनेक मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला. नागपूर मतदारसंघात 47 आणि रामटेकमध्ये तर फक्त 43 टक्के मतदान झाले. त्याच्या कारणांचा शोध घेऊन मतदानाविषयी जागृती वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने प्रथमच देशभरात 60 ठिकाणी मतदार जागृती निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने 70 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती मतदार जागृती निरीक्षक रवींद्रनाथ मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

एखाद्या ठिकाणी कमी मतदान होण्यामागे मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यास अनुत्साही असणे हे प्रमुख कारण आहे. या शिवाय स्थानिक कारणेही असतात. त्या मागच्या कारणांचा शाध घेऊन विश्लेषण करणार आहे. लोकांनी अधिकाधिक संख्येने मतदार नोंदणी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मिश्रा यांनी केले. महाविद्यालयीन तरूण या बाबतीत थोडा आळस करतो. पण त्यांना प्रेरीत करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. महाविद्यालयातून जागृती करण्यात आली. येत्या 21 मार्चपर्यंत मतदारनोंदणी करता येऊ शकते, असे मिश्रा म्हणाले.

मतदार जागृती कार्यक्रम देशभर राबवल्यामुळे यावर्षी सुमारे 6 कोटी नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्या नंतरही मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केलेली नाही. स्थलांतरीत नागरिकांनी फार्म-8 भरल्यास त्यांच्या राज्यातील मतदार यादीतून त्यांचे नाव वगळून महाराष्ट्रात त्यांचे नाव नोंदविण्यात येईल, असे मिश्रा यांनी सांगितले. मतदारयादीत नाव असल्यास आणि जवळ फोटो ओळखपत्र नसल्यास मतदान करता येईल, असे ते म्हणाले. मतदार नोंदणी कार्यक्रम राबविल्यामुळे जिल्ह्यात नवीन 35 हजार मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.