आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electrica Tower Effecting On Cropes : D Mallikaarjun Reddy

इलेक्ट्रिक टॉवरमुळे पिकांचे नुकसान : डी मल्लिकार्जुन रेड्डी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रामटेक - शेतक-यांच्या शेतात बेकायदेशीर पध्‍दतीने अदानी समूहातर्फे हायपावर इलेक्ट्रीक टॉवर उभारण्‍यात आल्‍याने पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला.अशा प्रकारचा आरोप शेतक-यांच्या निवेदनात ही करण्‍यात आला आहे.

शेतक-यांनी विभागीय अधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कंपनी शेतक-यांना देत असलेल्या नुकसान भरपाईत भेदभाव करत आहे्.अदानी समुहाद्वारे हायपावर इलेक्ट्रिक टॉवर उभारण्‍याचे काम प्रगतिपथावर आहे. या इलेक्ट्रीक टॉवर्स मुळे गहू, हरभरा, मिरची, टोमॅटो, या पिकांवर मोठ्या प्रमाणावर घातक परिणाम होत आहे. शेतक-यांना आमिष,धमकींच्या नोटिसा देऊन त्यांच्या जमीन बळकावण्‍यात आल्या आहेत.

इलेक्ट्रीक टॉवर्समुळे बांधकाम,विहिरी,जनावरांचे शेड, बागा,शेती आदींवर परिणाम होऊ शकतो. नुकसान भरपाई निश्चित करण्‍याचे अधिकार उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांना आहे. मात्र नियमानुसार शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.