आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल धनादेशाचे होतेय एजंटमार्फत वितरण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रमाई घरकुलाच्या धनादेशाचे वतिरण एजंटमार्फत होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरकुल निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या पिव्होटेक कंपनीची माहिती मागवत चौकशी केली जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती मििलंद बांबल यांनी दिली. शिवाय एजंटमार्फत केले जाणारे धनादेशाचे वतिरण थांबवत त्यांच्या कक्षात तब्बल तीनशे लाभार्थ्यांना एकाच दिवशी धनादेश वितरीत करण्यात आले.
महापालिकेकडून दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याची योजना आहे. एक लाख ९० हजार रुपयांचे अनुदान एका घरकुलासाठी प्राप्त होते. घरकुलाच्या बांधकामाकरतिा प्रथम एक लाखाचा, तर नंतर ८० हजार रुपयांचा धनादेश, अशा दोन टप्प्यांमध्ये दिला जातो. महापालिका क्षेत्रातील बीपीएल अंतर्गत येणाऱ्या ६६७ कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. ६६७ लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामासाठी धनादेशाचे वतिरण एजंटमार्फत होत असल्याची माहिती स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांना मिळाली.
लाभार्थ्यांकडून आलेल्या तक्रारीनंतर शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम व रमाई घरकुल योजनेशी संबंधति दविाकर लकडे नामक कर्मचाऱ्यांस बोलवत सभापतीकडून विचारणा करण्यात आली.
धनादेशाचे वतिरण स्थायी समिती सभापतींच्या कक्षामध्ये केले जाणार असल्याचे बांबल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. गुरुवार व शुक्रवारी एकूण तीनशे लाभार्थ्यांना धनादेशाचे वतिरण केल्याची माहिती बांबल यांनी दिली. उर्वरति ३६७ लाभार्थ्यांना येथेच धनादेश देण्याबाबत संबंधति विभागाला सभापतीकडून सूचना देण्यात आल्या. शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पवि्होटेक कंपनी बाबत माहिती मागविण्यात आली आहे. या विषयावर पुढील स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. धनादेश वाटप प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाणार असल्याचे देखील बांबल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.