आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोहयो’च्या आढाव्याची राज्यात आता एकच तारीख; मंत्री राऊत यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘राज्यातील रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यासाठी आता एकाच दिवशी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधीची तारीख मंत्रालयातून निघणार आहे,’ अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना व जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेचा आणि जलसंधारणाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

रोजगार हमी योजना, जलसंधारणमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये आढावा बैठकीअभावी कामे रखडली आहेत. या बाबीची गंभीर दखल घेत नितीन राऊत यांनी यानंतर राज्यात एकाच दिवशी आणि एकाच तारखेला रोजगार हमी योजनेची आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले.

आता मंत्रालयातून या आढावा बैठकीची तारीख ठरवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.