आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encroachment On Forest Remove Forest Minister Sudhir Munganitwar

वन जमिनीवरील अतिक्रमणे काढणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये वन विभागाच्या १३२ हेक्टर ५३ आर जमिनीवर २००२-०३ पासून अतिक्रमणे आहेत. यापैकी ६९.१८ हेक्टरवरील अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित अतिक्रमणे येत्या तीन महिन्यांत काढण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. वनजमिनीवर असलेल्या आदिवासी तसेच इतर अतिक्रमणांना दावे दाखल करण्याची मुदत दिली जाते. दिलेल्या मुदतीत कोणी दावे दाखल न केल्यास ते अतिक्रमण काढले जाते. त्यानुसार अतिक्रमण काढण्यात येत आहे. तसेच ११.५० हेक्टर क्षेत्रावरील दोन अतिक्रमणांसंदर्भात खटले दाखल करण्यात आले असून अतिक्रमणांची संख्या ४७ असल्याचे ते म्हणाले.

एनजीओंचे प्रोत्साहन : काही एनजीओ वनजमिनीवर अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा आराेप मुनगंटीवारांनी यांनी केला. जंगल वाढवणे ही केवळ वन खात्याचीच नव्हे तर वसामान्य नागरिक तसेच लोकप्रतिनिधींचीही जबाबदारी आहे. आमदारांनी वनजमिनीवरील अतिक्रमणाची माहिती द्यावी तसेच वृक्षारोपणावर आमदार निधी खर्च करावा, असे आवाहनही मुनगंटीवारांनी केले.