आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्यात अभियंत्यांना आहेत चांगले दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांबद्दल अनेक गैरसमज आहेत. भविष्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या सर्वाधिक संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे वळावे, असे आवाहन खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित एका संयुक्त पत्रकार परिषदेत प्राचार्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दलचे गैरसमज दूर केले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव श्रीकांत चेंडके, मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. मराठे, प्रा. मेघे कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. जी. आर. बमनोटे, प्रा. एच. आर. देशमुख, प्रा. हेमंत देशमुख या वेळी उपस्थित होते.
फ्यूचर इंजिनिअरिंग
- आगामी पाच वर्षांत एक कोटी रुपयांची गुंतवणूक मूलभूत सुविधांवर होणार आहे. त्यासाठी इंजिनिअर लागतील.
- 2022 पर्यंत पाच कोटी प्रशिक्षित मनुष्यबळ देशाला लागेल. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त मनुष्यबळ इंजिनिअर असतील.

- प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातही रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यातील कॉलेज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
- प्रो. राम मेघे कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर
- पी. आर. पाटील कॉलेज
- सिपना इंजिनियरिंग कॉलेज
- श्रीहव्याप्रमंचे इंजिनिअरिंग कॉलेज
- जी. एच. रायसोनी कॉलेज
- आयबीएसएस कॉलेज
- धामगणगाव एज्युकेशन सोसायटी कॉलेज
शिष्यवृत्ती मिळते
आरक्षणास पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्यांना आरक्षण नाही, त्यांना शैक्षणिक कर्जही घेता येते. कर्जाची परतफेड पदवीनंतर वर्षभरानंतर 120 हप्त्यांत करावी लागते. त्याचा व्याजदर 12.70% आहे.
हेमंत देशमुख
गैरसमज दूर करा
पश्चिम विदर्भातील इंजिनिअरिंग कॉलेजदेखील दर्जेदार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुंबई, पुण्याचाच नाद धरणे योग्य नाही. अनेक नामवंत इंजिनिअर पश्चिम विदर्भातून घडले आहेत. त्यांना चांगला पगारही मिळत आहे.
डॉ. ए. बी. मराठे, प्राचार्य
असे आहेत गैरसमज वस्तुस्थितीचा दावा
इंजिनिअरिंग अभ्यासक्रम अत्यंत महागडा आहे.
०आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांना शुल्क लागत नाही.
नोकर्‍यांच्या संधी मर्यादित
०2020 पर्यंत देशाला 25 लाख इंजिनिअर लागतील.
स्पर्धा परीक्षांसाठी वेळ देता येत नाही. ० वेळेचे नियोजन केल्यास अभ्यास शक्य.
अभ्यासक्रम खूप जुना आहे.
०एनआयसीटीईच्या निकषांनुसार अभ्यासक्रम असतो.
विषय खूपच कठीण असतात.
०पूर्णत: चुकीचे. थोडे परिश्रम केल्यास विषय कळतात.
मुंबई, पुण्याचेच कॉलेज चांगले. ०सर्वत्र सारखाच अभ्यासक्रम व शिकवण्याची पद्धत हीदेखील सारखीच आहे.