आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमधील ईव्हीएमचे ‘चेकअप’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधानसभा निवडणुकीसाठी छत्तीसगड राज्यातून अमरावतीत दाखल झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीनची (इव्हीएम) तपासणी सुरू झाली आहे. अप्पर वर्धा वसाहतीतील मनोरंजनगृहात सुरू असलेले हे तपासणी अभियान आणखी पंधरा दिवस चालणार आहे.

3,690 बॅलेट युनिट्स व 3,250 कंट्रोल युनिट्स असे मिळून सहा हजार 940 यंत्र अमरावतीत दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र धुरजड यांच्या मार्गदर्शनात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रकाश देशपांडे यांनी ही यंत्रे अमरावतीत आणली आहेत.
यंत्रांचे फर्स्ट लेव्हल चेकिंग सुरू आहे. त्यासाठी हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (ईसीआयएल) मुख्य तंत्रज्ञ व्ही. के. देसाई व त्यांची चमूही येथे पोहोचली आहे.
तपासणी सुरू आहे, आढावा घेणे सुरू
४ छत्तीसगढ येथून आणलेल्या यंत्रांची खातरजमा अत्यावश्यक आहे. निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकारी म्हणून मी व उपजिल्हाधिकारी आढावा घेत आहोत.
रवींद्र धुरजड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती.
तीन जिल्ह्यांतून आली यंत्रे
यापूर्वी या यंत्रांचा वापर छत्तीसगढ येथे करण्यात आला होता. राजनांदगाव, कांकेर व कोंढागाव येथून ही यंत्रे (बीयू व सीयू) अमरावतीत आणली गेली. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा वापर केला जाणार आहे. तत्पूर्वी या सर्व यंत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा आयोगाचा दंडक आहे.
फोटो - अमरावतीत नव्याने दाखल झालेल्या ईव्हीएमची तपासणी करताना ईसीआयएलचे तंत्रज्ञ व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र धुरजड.