आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ex Minister Mahadev Shivankar XUV Car Accident In Bhandara

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मंत्री महादेव शिवणकरांच्या गाडीच्या धडकेत एक ठार, एक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा - माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांच्या गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील १५ वर्षीय मुलगा ठार झाला आहे. दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गुंथाळा फाट्यावर शिवणकरांच्या महिंद्रा एक्सयुव्ही गाडीने रस्ता ओलंडत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मागच्या सीटवर बसलेला हितेंद्र म्हस्के (१५) जागीच ठार झाला तर, दुचाकी चालक जीतू पंदरे गंभीर जखमी झाला आहे. शिवणकरांच्या गाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

(छायाचित्र - संग्रहित)