आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facility Of State And Praising Modi It's Not In Here Nitish Rane

सुविधा राज्याच्या अन् गुणगान मोदींचे चालणार नाही - नीतेश राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘सुविधा आणि सवलती महाराष्ट्राच्या अन् गुणगान गुजरातचे आणि मोदींचे करता. हा प्रकार आम्ही मुळीच सहन करणार नाही’, अशा शब्दात उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमान संघटनेचे नेते नीतेश राणे यांनी लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कठोर शब्दांत प्रहार केले. लतादीदींचे भारतरत्न परत घेण्याच्या काँग्रेस नेते जनार्दन चांदुरकर यांच्या मागणीचेही राणे यांनी समर्थनही केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात नीतेश राणे बोलत होते. ते म्हणाले की, लतादीदींना सा-या सुविधा महाराष्ट्रातून मिळतात. त्यांच्या रुग्णालयासाठी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली, याचे भान न ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना न बोलवता त्या मोदींना उद््घाटनासाठी कशा काय बोलावतात? लतादीदींचे भारतरत्न परत घेण्याची चांदुरकर यांची मागणी योग्य असून, त्याचे आपण समर्थन करतो. अमिताभ बच्चन हे गुजरातमध्ये असते तर एवढे मोठे झाले असते काय? त्यांनाही महाराष्ट्रानेच घडवले व मोठे केले. आज तेही गुजरातचेच गुणगान करताना दिसतात. हा प्रकार आम्ही मुळीच सहन करणार नाही, असे राणे म्हणाले.
‘गुजराती लोकांनी गुजरातमध्येच जावे’ या आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे नमूद करताना राणे म्हणाले की, प्रत्यक्षात गुजरातचा विकासच झालेला नाही, अन्यथा येथील गुजराती तेथेच गेले असते. मोदींना पंतप्रधान व्हायचे असेल, तर त्यांनी नुसता गुजरातचा गवगवा करायला नको. त्यांनी सर्वांबाबत समान भूमिका घ्यावी. गुजरात म्हणजे सारा देश नाही, याकडेही राणे यांनी लक्ष वेधले.