आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात सराफावर तोतया सीबीआयचा छापा, नाटक उघड होताच पसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘स्पेशल 26’ चित्रपटासारखा प्रकार मंगळवारी अकोल्यात होता होता फसला. तोतया सीबीआय पथकाने येथील सराफा व्यावसायिकाच्या घरी छापा टाकला खरा, परंतु आक्षेपार्ह असे काहीच न आढळल्याने पथकाची गोची झाली. त्यातच व्यावसायिकाने ‘निल’ पंचनाम्याची मागणी करताच या बनावट पथकाने काढता पाय घेतला.


सराफा व्यावसायिक प्रशांत झांबड यांच्या शास्त्रीनगरातील घरी धडकलेल्या पथकाने सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत घराची झडती घेतली. काही तासांच्या तपासणीत पथकाला काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यावर झांबड यांनी पथकाकडे ‘नील’ पंचनाम्याची मागणी केली. त्यामुळे पथकातील तोतयांचे चेहरे पांढरे पडले. नंतर पथकाने चक्क सीबीआयच्या लेटरहेडवर ‘नील’ अहवाल देत तेथून काढता पाय घेतला. हे पथक तोतया असल्याची झांबड यांना शंका आली. सराफा असोसिएशनच्या पदाधिका-यांसह सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांनी तक्रार दिली. त्यावर पोलिस चौकशी करत आहेत.


बॉक्स...
तुम्ही स्मगलिंग करता...

तुमच्याविरुद्ध स्मगलिंग करत असल्याची तक्रार आहे, असे पथकातील अधिकारी झांबड यांना म्हणाला. काही वेळ झांबड गोंधळून गेले. नंतर पथकाने कपाटांची झडती घेतली. काही दागिने टेबलावर ठेवले. नंतर कारखान्यातही झडती घेण्यात आली. मात्र काहीच आक्षेपार्ह आढळून आले नाही म्हटल्यावर तोतयांची भंबेरी उडाली. दरम्यान, झांबड यांची तक्रार मिळाली असून, त्यावर चौकशी सुरू आहे, असे सिव्हिल लाइन्स ठाण्याचे ठाणेदार पी. एस.आकोटकर यांनी सांगितले.


पथकही भारी हुश्शार!
० पथक बनावट असले तरी ते भारी हुशार होते. मोठ्या अविर्भावात त्याने झांबड यांच्या घरात प्रवेश केला.
० सोनी वाहिनीवरील सीआयडी मालिकेत मकरंद व अनिता ही पात्रे आहेत. तोतया पथकातील अधिका-यांनीही आपली नावे हीच सांगितली.
० घरातील सर्वच सदस्यांना मोबाइल फोन बंद करण्यास सांगण्यात आले. लॅँडलाईन फोनचे रिसिव्हरदेखील उचलून ठेवले.
० सर्च वॉरंटची मागणी केल्यावर झांबड यांचे नाव लिहिलेला एक इंग्रजी भाषेतील कागद पथकाने पुढे केला.
० ख-या सीबीआय पथकाच्या अविर्भावात तोतयांनी ही कारवाई करातना कुठेही शंकेला वाव मिळू दिला नाही, हे विशेष.
वकील, सीएचे नाव काढताच भंबेरी
वकिल, सीए किंवा पोलिसांना बोलावतो असे आम्ही म्हणालो. त्यावर काही मिळालेच नाही तर कशाला बोलावता असे पथकातील अधिकारी म्हणाले.


प्रशांत झांबड, सराफा व्यावसायिक
तासांच्या तपासणीत पथकाला काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यावर झांबड यांनी पथकाकडे ‘नील’ पंचनाम्याची मागणी केली. त्यामुळे पथकातील तोतयांचे चेहरे पांढरे पडले. नंतर पथकाने चक्क सीबीआयच्या लेटरहेडवर ‘नील’ अहवाल देत तेथून काढता पाय घेतला. हे पथक तोतया असल्याची झांबड यांना शंका आली. सराफा असोसिएशनच्या पदाधिका-यांसह सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात धाव घेत त्यांनी तक्रार दिली. त्यावर पोलिस चौकशी करत आहेत.
तुम्ही स्मगलिंग करता... : तुमच्याविरुद्ध स्मगलिंग करत असल्याची तक्रार आहे, असे पथकातील अधिकारी झांबड यांना म्हणाला. काही वेळ झांबड गोंधळून गेले. नंतर पथकाने कपाटांची झडती घेतली.
काही दागिने टेबलावर ठेवले. नंतर कारखान्यातही झडती घेण्यात आली. मात्र काहीच आक्षेपार्ह आढळून आले
नाही म्हटल्यावर तोतयांची भंबेरी उडाली. दरम्यान, झांबड यांची तक्रार मिळाली असून, त्यावर चौकशी सुरू आहे, असे सिव्हिल लाइन्स ठाण्याचे ठाणेदार पी. एस.आकोटकर यांनी सांगितले.


पथकही भारी हुश्शार!
० पथक बनावट असले तरी ते भारी हुशार होते. मोठ्या अविर्भावात त्याने झांबड यांच्या घरात प्रवेश केला.
० सोनी वाहिनीवरील सीआयडी मालिकेत मकरंद व अनिता ही पात्रे आहेत. तोतया पथकातील अधिका-यांनीही आपली नावे हीच सांगितली.
० घरातील सर्वच सदस्यांना मोबाइल फोन बंद करण्यास सांगितले. लॅँडलाईन फोनचे रिसिव्हरदेखील उचलून ठेवले.
० सर्च वॉरंटची मागणी केल्यावर झांबड यांचे नाव लिहिलेला एक इंग्रजी भाषेतील कागद पथकाने पुढे केला.
० ख-या सीबीआय पथकाच्या अविर्भावात तोतयांनी ही कारवाई करातना कुठेही शंकेला वाव मिळू दिला नाही, हे विशेष.


वकील, सीएचे नाव काढताच भंबेरी
वकील, सीए किंवा पोलिसांना बोलावतो असे आम्ही म्हणालो. त्यावर काही मिळालेच नाही तर कशाला बोलावता असे पथकातील अधिकारी म्हणाले.
प्रशांत झांबड, सराफा व्यावसायिक


पथकात महिला व तरुणीही
दिल्ली येथील अर्जुन मकरंद यांच्या टीमने झांबड यांच्या संपत्तीची पाहणी केल्याचे पत्र बिनधास्त दिले. 8 ते 10 जणांच्या पथकात एक महिला व एका तरुणीचाही समावेश होता. हे सर्व दोन झायलो गाडीतून आले होते. झांबड यांनी गाडीचा फोटोही काढला आहे.