आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया ‘पीए’च्या मोबाइलवरून मिळणार धागेदोरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करून आठ आमदार व सुमारे तीनशे लोकांना गंडा घालणारे भामटे प्रवीण शिरसाट व सदाशिव वाघ यांच्या मोबाइल क्रमांकावरून झालेल्या कॉल्सचा पोलिस बारकाईने तपास करत आहेत. मागील चार महिन्यात त्यांनी कोणाकोणाला फोन केला, याची माहिती घेतली जात आहे. दोन्ही आरोपींची सखोल माहिती घेण्यासाठी अमरावती पोलिसांचे एक पथक त्यांच्या मूळ गावी धुळे येथे गेले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याचीही खातरजमा करण्यात येत आहे.
क्रीडा खात्यांतर्गत येणार्‍या ‘गाव तेथे व्यायामशाळा’ या योजनेचे सरकार दरबारी सादर करण्याचे प्रस्ताव अमरावतीमधील दोन आमदारांना विकत असताना या दोघांना 22 जून रोजी अटक करण्यात आली होती.