आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्सी क्रमांकाच्या गाड्या जप्तीचा पोलिसांना अधिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मोटर व्हेइकल अ‍ॅक्टनुसार फॅन्सी क्रमांकाच्या नंबर प्लेट असलेल्या गाड्या जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. तसेच ‘हा मुद्दा जनहित याचिका म्हणून दाखल करून घेण्यात यावा,’ असे निर्देशही दिले.

फॅन्सी नंबर प्लेटची वाहने दिसत असल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे गुन्हे तपासात पोलिसांना असंख्य अडचणी येतात. याबाबत सतपाल सिंग रसपाल सिंग रेणू यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी यावर बाजू मांडताना राज्य सरकारच्या अंतर्गत हा विषय येत नसल्याचे शपथपत्राद्वारे सांगितले हाेते. त्यामुळे यात केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनचालकांकडून केवळ शंभर रुपये दंड आकारण्यात येतो. ही रक्कम भरल्यानंतर वाहन सोडून देण्यात येते. त्यामुळे फॅन्सी क्रमांकाच्या नंबर प्लेट असलेल्या गाड्या ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत का? अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांना केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...