आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: दुष्काळग्रस्त गावात पाणी भरण्यासाठी शेतकऱ्याने केले तीन लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देंगमाल (महाराष्ट्र) - निसर्गाच्या कोपावर माणूस कसा आणि काय उपाय शोधेल हे सांगणे अवघड आहे. मात्र हे उपाय आजच्या आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाजातही स्त्रीला दासी ठरवताना दिसत आहेत. वरील छायाचित्रात सखाराम भगत त्याच्या तीन पत्नींसोबत दिसत आहे. त्याची पहिली पत्नी आहे तुकी. इतर दोघी सखरी आणि भागी. तुकीला सखारामच्या अधिकृत पत्नीचा दर्जा आहे, तर इतर दोघी या 'पाणीवाली बाई' नावाने ओळखल्या जातात. तुकीपासून सखारामला सहा मुले आहेत. सखारामचे कुटुंब महाराष्ट्रातील दुष्काळी विदर्भातील देंगमाल येथे राहाते. या गावात प्रत्येक घरात बहुपत्नीत्वाची पद्धत अनेक वर्षांपासून चालत आली आहे. याला पंचायतीचीही मान्यता आहे.
देंगमाल गावातील बहुपत्नी पद्धतीमागचे कारण आहे येथील दुष्काळी परिस्थिती. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण, ते खरे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे तरी या गावात अजून नळ नाही. त्यामुळे महिला कित्येक किलोमीटर पायपीट करुन पाणी आणतात. पाणी आणण्यासाठी महिलांची गरज असते. घरात हक्काची महिला म्हणजे पत्नी आणि त्यामुळे येथील लोक एकापेक्षा जास्त लग्न करतात आणि घरात बायकांची संख्या वाढवतात. पहिल्या पत्नीला कुटुंबात अधिकृत दर्जा असतो तर इतर जणींना 'पाणीवाली बाई' म्हटले जाते. ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे किंवा ज्यांना पतीने सोडून दिले आहे, अशा महिलांसोबत विवाह करुन त्यांना 'पाणीवाली बाई' बनवले जाते.
मुलींच्या जन्माचा उत्सव, पाणी भरण्यासाठी आणखी एक मिळाली
या गावात मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो. वरकरणी हे वाक्य पुरोगामी आणि पुढारलेल्या समाजाचे लक्षण वाटत असले तरी त्याची दुसरी बाजू वेगळी आहे. हा आनंद साजरा करण्याचे कारण म्हणजे पाणी भरण्यासाठी आणखी एक 'हक्काची महिला' मिळाली असे येथे मानले जाते. या गावातील मुलींचे लग्न अशाच ठिकाणच्या मुलासोबत केले जाते, जिथे नळ आहेत आणि मुबलक प्रमाणात पाणी आहे. जेणे करुन आपल्या वाट्याला आलेले पाण्याचे भोग आपल्या मुलीला भोगावे लागू नये.
सखाराम भगत हा मोजकी शेती असलेला छोटा शेतकरी आहे. त्यांच्या घरी दिवसभरात 100 लिटर पाणी लागते. त्यासाठी त्यांना पाण्याचे भरलेले हंडे घेऊन अनेक चकरा माराव्या लागतात. पहिली पत्नी लग्नानंतर काही दिवसांतच गर्भवती राहिली होती. त्यामुळे तिला पाण्याने भरलेले हंडे घेऊन चालता येत नव्हते. त्यामुळे सखारामने दुसरे लग्न केले. दुसरीचे तिचे वय थोडे जास्त होते. काही दिवसांनी तिलाही पाणी आणणे शक्य होऊ लागले नाही, तेव्हा त्याने तिसरे लग्न केले. तिसरीचे वय तेव्हा होते 26 वर्षे. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. आता पहिली मुलांना सांभाळते, दुसरी आणि तिसरी घरातील कामे पाहाते. अशा पद्धतीने तिघीही एकाच घरात नांदतात. यात पहिलीवर मात्र अधिक जबाबदारी असते. तिला बाकीच्या दोघींवर लक्ष ठेवावे लागते. घर म्हटले की भांड्याला भांडे लागणारच, याला भगत यांचे घर अपवाद नाही. तिघींमध्ये कुरबुरी आणि भांडणेही होतात पण त्या पुन्हा एकत्र येतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सखाराम भगत आणि त्यांच्या पत्नी व गावातील छायाचित्रे