आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेने कर्ज नाकारल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, पिंपरीत महिलेने जीवन संपवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी (जि. अमरावती) - महाराष्ट्र बँकेने कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्यास नकार दिल्याने २० टक्के दराने कर्ज देऊ असे सांगितल्याने तालुक्यातील नशीरपूर येथील सुधीर गावंडे (वय ४२) या शेतकऱ्याने शुक्रवारी आत्महत्या केली.

सुधीर यांच्याकडे २२ एकर शेती आहे. त्यांच्याकडे मोर्शीच्या महाराष्ट्र बँकेचे कर्ज थकीत आहे. या वर्षी नापिकी दुष्काळामुळे ते कर्जफेड करू शकले नाहीत. शासनाने कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा कर्ज िमळेल, अशी आशा त्यांना होती. त्यांचे मोठे बंधू प्रशांत यांनी सांगितले,‘सुधीर बँकेत कर्जासाठी खेटे घालत होते. सकाळी ११ वाजता ते चौकशीसाठी बँकेत गेले होते. अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. कर्जवाटपाबाबत आदेश असल्याचे सांगितल्यानंतर २० टक्के दराने कर्ज देऊ, असे संबंधित अधिकाऱ्याने सुधीरला सांगितले. निराश अवस्थेत घरी येऊन त्यांनी पाळण्याला गळफास घेतला.’ सुधीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
मुख्यमंत्री मुक्कामी राहिलेल्या पिंपरीत महिलेची आत्महत्या
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 मे राेजी मुक्काम करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या यवतमाळमधील पिंपरी बुटीच्या शांताबाई ताजणे यांनी गुरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही पंप जोडणी न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.