आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आत्महत्यांवर सरकार असंवेदनशील - धनंजय मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर राज्य सरकार अत्यंत असंवेदनशील असून पॅकेज जाहीर करूनही त्यातील एक दमडीही मिळाल्याने शेतकर्‍यांसमोर पर्यायच राहिलेला नाही,’ अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नागपुरात बोलताना केली.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागपुरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व नागपूर जिल्ह्याचे प्रभारी धनंजय मुंडे यांनी केले. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चानंतर मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारच्या धोरणावर टीका केली.

राज्य शासनाने पॅकेज जाहीर करून दोन महिने उलटले तरी शेतकर्‍यांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी म्हटले. आघाडीच्या शासनकाळात कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपये क्विंटल दर मिळायचा. मात्र, आता चार हजार रुपयेदेखील मिळत नाहीत.
धान, ऊस, सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. राज्यातील पावणेदोन कोटी एपीएल रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात सुरू असलेले धान्यवितरण बंद करून सरकार गरिबांवर अन्याय करीत अाहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

राज्यात विदर्भापेक्षाही मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शिवाय, भुजबळ यांनी स्वत:हून एसआयटी चौकशीची तयारी दर्शवली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आणि फेब्रुवारीला पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संमेलन होत असून त्यात केंद्र राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

(फोटो : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न घेऊन नागपुरातील संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत डोक्यावर कापसाचा भारा घेऊन पदयात्रा काढली.)