आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा बसवण्यासाठी ‘फाशी दो’ आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गर्ल्स हायस्कूल चौकात साहति्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावा, यासाठी लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रावसाहेब शेखावत, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांचे फोटो असलेले फलक महापालिका इमारतीवर फडकवत ‘फाशी दो’ आंदोलन केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीचा हा लढा संघटनांनी अनेक वर्षांपासून चालवला आहे. गर्ल्स हायस्कूल चौकात पुतळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेदेखील जागा देण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरति संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आहे. ‘फाशी दो’ आंदोलनाच्या माध्यमातून त्या रागास वाट देण्यात आली.
दुपारी दीडच्या सुमारास लहूजी शक्ती सेनेचे ५० ते ६० कार्यकर्ते पालिकेत शिरले. कुणाला काही कळायच्या आत त्यातील १५ ते १२ कार्यकर्ते पालिकेच्या मुख्य इमारतीवर चढले. सहायक संचालक नगर रचना कार्यालयाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वाराने ते इमारतीवर चढले.
तेथे संबंधितांचे प्रतीकात्मक फाशीचे फलक फडकवण्यात आले. अण्णाभाऊंचा पुतळा गर्ल्स हायस्कूल चौकातच बसवला गेला पाहिजे. दुर्लक्ष करणाऱ्यांना फाशी देण्याच्या उद्देशाने आंदोलन करण्यात आल्याचे लहूजी शक्ती सेनेने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुक जवळ येत आहे, तसे अनेक सामाजिक संघटना, जातीगट, कर्मचारी संघटना, समुहगट आदींची आंदोलने तीव्र झाली आहेत. आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी आंदोलक नवनवीन फंडे शोधत आहेत. त्या फलकांवरवर उल्लेिखत संबंधितांची फाशी देण्यात आलेले फोटो काढण्यात आले आहेत. महापालिका इमारतीवर ‘वीरुगिरी’ सुरू असताना खाली प्रांगणात कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. या वेळी रूपेश खडसे, पंकज जाधव, प्रभू सापळे, आकाश खंडाने, कैलाश स्वर्ग, विजय थोरात आदी कार्यकर्ते उपस्थति होते.
पोलिस आल्यानंतर केला तत्काळ पोबारा
लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याचा सहारा घेत अनोखे आंदोलन करून लक्ष वेधले. मात्र, पोलिस आल्यानंतर कार्यकर्ते व पदािधकारी यांनी तेथून तत्काळ काढता पाय घेत निघून जाणे पसंत केले.