आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Tired From Poverty Kills Her Daughter In Maharashtra

गरीबीला कंटाळून जन्मदात्याने दोन मुलींची केली विहिरीत बुडवून हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रम्हपुरी- एका जन्मदात्या पित्याने आपल्या दोन मुलींची विहिरीत बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी शिवारात घडली. आरोपी तामदेव झरकरला (35) पोलिसांनी अटक केली असून तो नागभीड तालुक्यातील पारडी गावातील रहिवासी आहे.
आरोपी पित्याने रविवारी (19 एप्रिल) आपल्या दोन्ही मुलींना घेऊन एका धार्मिक प्रवचनाला जातो, असे पत्नी अलका झारकर हिला सांगितले. मात्र, घरी तो एकटाच परतला. आपल्या दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची खोटी बतावणी त्याने केली. अलका झारकरला पतीवर अशंय आला. तिने पोलिसांना सगळी माहिती सांगितली.

आरोपी तामदेव याने आधी दोन्ही मुलींना (भावना झरकर (11) व जागृती झरकर (9)) विहिरीत फेकले. परंतु विहिरीत पाणी कमी होते. त्यामुळे त्या बचावल्या. मात्र त्यानंतर तामदेव विहिरीत उतरुन त्याने दोघींना पाण्यात बुडवून त्यांचा निर्घृण हत्या केली. गरीबीला कंटाळून आपण दोन्ही मुलींची हत्या केल्याची कबुली तामदेवने दिली आहे.

दरम्यान, अलका झारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेची छायाचित्रे...