आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत्रा नगरीची ओळख आता सौंदर्यवतींचे शहर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले नागपूर आता सौंदर्यवतींचे शहर म्हणून ओळखले गेले तर नवल वाटायला नको. नागपूरच्या तीन कन्या फेमिना मिस इंडिया २०१३ च्या अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. नागपूर गर्ल मानसी मोघे, खुशबू वैद्य, लोपमुद्रा राऊत या तीन सौंदर्यवती अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मानसी वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे तिथ पर्यंत पोहचली आहे. सात हजार स्पर्धकांना मागे टाकून त्यांनी अंतिम फेरी पर्यंत झेप घेतली आहे. पाँडस् फेमिना मिस इंडिया २०१३ च्या विजेतीची घोषणा २४ मार्च रोजी होणार आहे.

मानसी मोघे :

इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी असलेली २१ वर्षीय मानसी मोघेचा जन्म इंदूर येथे झाला आहे. तिचे १२ वी पर्यंतचे शिक्षण तिथेच झाले आहे. इंदूरच्या एमजीएम मेडीकल कॉलेजमधून शिक्षण घेतलेले तिचे आई-वडील सध्या चंद्रपूर येथील कोल इंडियामध्ये कार्यरत आहेत.

अंतिम फेरी गाठलेली मानसी म्हणते, मी स्वतःला फार भाग्यशाली समजते. मात्र आता सामना अटीतटीचा आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की, ऑनलाईन व्होटींग करून मला मिस इंडिया किताबाच्या जवळ पोहचवावे.

लोपमुद्रा राऊत :

अंतिम फेरीतील १३ सौंदर्यवतींमध्ये स्थान मिळालेली आणखी एक नागपूर गर्ल आहे लोपमुद्रा राऊत. नागपूरमध्ये झालेल्या पाँडस् फेमिना मिस इंडिया २०१३ मधून ती फेमिना मिस इंडिया पीजेंटमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गोवा येथे होत असलेल्या मिस इंडिया स्पर्धेतील पहिल्या १३ रनरअपमध्ये तिचे नाव आहे. यात काश्मिर, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील ललनांचा समावेश आहे. या सर्वांनाच ग्लॅमरस बॉलिवूड खूणावत असून त्यांना रेड कार्पेटवर चालण्याची इच्छा आहे.

लोपमुद्राला बॉलिवूडची ओढ

रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी असलेली लोपमुद्रा इलेक्ट्रीकल इंजिंनिअरिंगच्या तृतीय वर्षात आहे. तिने आतापर्यंत अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तिला बेस्ट वॉक, बेस्ट हेअर, बेस्ट फिगर, फेस ऑफ द इअर या सारखे पुरस्कार मिळाले आहेत. लोपमुद्राला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याची इच्छा आहे.

खुशबू वैद्य :

हिस्लॉप कॉलेजची विद्यार्थीनी असेलेली खुशबू पॉडस् फेमिना मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धकांमध्ये सहभागी आहे. मिस पुणे स्पर्धेतील फायनलिस्ट असल्यामुळे तिला या स्पर्धेत सरळ प्रवेश मिळाला आहे. तिची इच्छा ग्लॅमरस फॅशन वर्ल्डमध्ये नाव कमावण्याची आहे. मॉडलींग आणि अभिनय यात तिला विशेष आवड आहे. अर्थात तिचा कल देखील बॉलिवूडकडेच आहे.


पुढील स्लाईडमध्ये पाहा, अंतिम फेरीत पोहचलेल्या सौंदर्यवती.