आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Asha Mirge Apologise On Her Unwanted Statement

आशा मिरगे यांची अखेर बेताल वक्तव्यासाठी माफी,पटेल यांचा कारवाईचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/ मुंबई - मुलींचे राहणीमान, वेशभूषा व हावभाव या गोष्टी बलात्काराला कारणीभूत ठरत असल्याचे वादग्रस्त विधान करणा-या राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी अखेर जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे, तर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याची पाठराखण केली.
खासदार सुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी नागपुरात झालेल्या युवती मेळाव्यात मिरगे यांनी असे बेताल वक्तव्य केले होते. असंख्य घटनांचा मी अभ्यास केला. त्यातूनच हे स्पष्ट मत मांडत आहे. समाजात विकृती वाढत आहे; पण अत्याचारांना महिलाही जबाबदार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता. दरम्यान, मिरगे यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे बुधवारी त्यांनी तातडीने या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली. ‘महिलांवर अत्याचार करणा-या नराधमांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी,’ असे मतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ही तर वयोवृद्ध मंडळींची शिकवणच : सुळे
‘डॉ. मिरगे यांनी जी मते मांडली ती कोणत्याही घरातील वयोवृद्ध मंडळी तरुणांना शिकवणीच्या स्वरुपात रोजच सांगत असतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मिरगे यांनी त्यांनी कालच्या वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे, त्यामुळे आता हे प्रकरण संपले आहे,’ अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मिरगे यांनी नागपुरात केलेले वक्तव्य सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत केलेले होते.
...तर कारवाई : पटेल
आमच्या पक्षातील कोणी जर असे असंवेदनशील वक्तव्य केले असेल तर पक्षातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे राष्‍ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.