आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्ता मेघेंचा सुपुत्रांसह भाजपात प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : दत्ता मेघे)
वर्धा/ नागपूर- काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे थोड्याच वेळात सुपूत्र सागर आणि समीर यांच्यासह भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण व वर्धा जिल्हय़ातील पक्षविरोधी कारवायांमुळे त्रस्त होऊन मेघेंनी हा निर्णय घेतला आहे.
सावंगी मेघे येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघे भाजपमध्ये प्रवेश करतील. यासाठी सावंगी मेघे येथील मेडीकल कॉलेज जवळच क्रीडा संकुलात मोठा डोम उभारला आहे. वर्धा जिल्हा भाजपतर्फे आयोजित कार्यक्रमात खासदार हंसराज अहीर, संजय धोत्रे, नाना पटोले, अशोक नेते, रामदास तडस व अजय संचेती यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पुत्र सागर यांच्या पराभवानंतर ते दत्ता मेघे कमालीचे असवस्थ होते. त्याआधी तिकीट वाटपावेळी त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याची भावना झाली होती. यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी आणि त्यांचे सुपुत्र सागर मेघे यांनी मागील महिन्यात काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. अखेर आज मेघे पिता-पुत्र गडकरींच्या उपस्थितीत भाजपात डेरेदाखल होत आहेत.