आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Against Bhavana Gawali, Sanjay Rathod News In Marathi

भावना गवळी, संजय राठोड यांच्यावर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही रामनवमीच्या शोभायात्रेत शिवसेनेचा प्रचार केल्याच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांच्यासह अन्य एकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नायब तहसीलदार भगत यांनी वडगावरोड पोलिसांत गुरुवारी सकाळी तक्रार दाखल केली.

‘प्रचाराची वेळ संपल्यानंतरही गवळी, राठोड यांनी रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हर-हर मोदी आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या,’ असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीचा नियोजित मार्ग परस्पर बदलला व वेळ संपल्यानंतरही प्रचार केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक बोबडे यांच्याविरोधातही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकल्याबाबतही शिवसेनेच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.