आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाजाला लागले फटाके, ध्वनी प्रदूषणात झाली घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- लक्ष्मीपूजनाच्या रात्री 1 वाजेपर्यंत फटाके फोडले जायचे. तीन-चार वर्षापूर्वीपर्यंतचे हे दृश्य बदलल्याचे रविवारी नागपुरात दिसून आले. सहयोग ट्रस्टद्वारे राबवण्यात येत असलेल्या फटाकेविरोधी अभियानाने याबाबत जागृती केली. परिणामी, आवाजी फटाके खूप कमी फुटले, असे फटाकेविरोधी अभियानाचे प्रणेते रवींद्र भुसारी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, फटाक्यांमुळे होणार्‍या आवाजाच्या पातळीत तुलनेने घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात दहा ठिकाणी फटाक्यांमुळे होणार्‍या आवाजाची पातळी मोजण्यात आली. 2012 मध्ये पुणे आणि मुंबईत सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होत असे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद केले आहे. या वर्षी लोकांनी जमीन चक्र, अनार, सेव्हन शॉट अशा फॅन्सी फटाक्यांना जास्त पसंती दिली. फटाक्यांच्या आवाजामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. तसेच धुरामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. पक्ष्यांसाठीही फटाके घातक आहे. दिवाळीत पक्षी जखमी झाल्याच्या वा भाजल्याच्या घटना घडतात. असे होऊ नये म्हणून दिवाळीत फटाके फोडू नका, असा प्रचार फटाकेविरोधी अभियानातर्फे 1990 पासून करण्यात येत आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे भुसारी यांनी सांगितले. शाळाशाळांतून जागृती केली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. फटाके खरेदी केली नाही, असे अनेक एसएमएस आल्याचे भुसारी यांनी सांगितले.

अशी झाली नागपुरात घट
परिसर 2011 2012
अजनी 81.2 68
सिव्हिल लाईन 69.6 62.3
धरमपेठ 68.5 69.2
इतवारी 71.8 76.2
सिव्हिल हॉस्पिटल्स 72.2 71.8
शंकरनगर 60.1 65.5
महाल 72.1 73.5
सदर 73.6 68.7
कळमना 76.9 66.7
(इक्विव्हॅलन्ट कन्टिन्युअस ध्वनी डेसीबल्समध्ये)